त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त अळिंबीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा कोरडी पडू न देता ओलसर ठेवतात. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. हे गुणधर्म त्वचेला ओलसर, गुळगुळीत आणि कोमल बनविण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच त्वचेसंबंधीच्या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतात. हे घटक त्वचेला नैसर्गिक चकाकी देतात. त्यामुळे त्वचा गोरी होते. तरुण मुला-मुलींना मुरुमांचा त्रास होतो. औषधोपचाराने ही मुरूमे कमी झाली तरी चेहरा विद्रूप दिसतो. या समस्येवर मात करण्यासाठी अळिंबी फायदेशीर ठरू शकते. अळिंबीमध्ये जीवाणूरोधक घटक आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. मुरुमांमुळे उद्भवणाऱ्या जिवाणूंना प्रतिबंधित करण्यात हे मदत करतात. याव्यतिरिक्त, मुरूम कमी करण्यात देखील हे गुणधर्म फायदेशीर ठरतात. वयोमानानुसार त्वचा रखरखीत, जुनी दिसून चेहऱ्यावर सुरकुत्या उमटतात. त्यासाठी अळिंबीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. वैज्ञानिक संशोधनानुसार अळिंबीच्या अर्कामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यास आणि अकाली वृद्धत्व येण्यापासून रोखण्यास मदत करतात. Tags: mushroom for