Skip to main content

Posts

Showing posts with the label mushroom pak kala

मश्रुम मसाला - Mushroom Masala

साहित्य: १५० ग्राम बटण मश्रुम ३ मध्यम कांदे, किसून ३ लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून ६ ते ७ काजू पाकळ्या ४ ते ५ लसूण पाकळ्या, ठेचून १ टिस्पून किसलेले आले २ टेस्पून तेल १ टिस्पून जिरे १ टेस्पून धणेजिरेपूड १ टिस्पून गरम मसाला १/२ टिस्पून हळद १ टिस्पून लाल तिखट २ टेस्पून चिरलेली कोथिंबीर चवीपुरते मिठ कृती: १) मश्रुम स्वच्छ पुसून घ्यावेत. जर मश्रुम मोठे असतील तर दोन तुकडे करावेत. २) तेल गरम करून त्यात जिरे, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. आले-लसूण घालावे. त्यात किसलेले कांदे घालून परतावे. काजू घालावेत. कांदा परतला कि त्यात टोमॅटो घालावे. मध्यम आचेवर तेल सुटेस्तोवर परतावे. मीठ, धणेजिरेपूड आणि गरम मसाला घालून मिक्स करावे. ३) त्यात मश्रुम घालून झाकण ठेवून मध्यम आचेवर वाफ काढावी. साधारण २० ते २५ मिनीटे वाफ काढावी. मश्रुम शिजल्यावर त्यात कोथिंबीर घालून सजवावे. टीप: १) जर एकदम फाईन ग्रेव्ही हवी असेल तर टोमॅटोसुद्धा किसून किंवा मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी. फक्त हि ग्रेव्ही चांगली घट्टसर बनवावी.