अळिंबी हे सर्वसाधारणपणे त्याच्या इंग्रजी नावाने म्हणजे ‘मशरूम’ या नावानेच जास्त प्रचलित आहे. पूर्वी अळिंबीविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. परंतु यात असलेले पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अलिकडे अळिंबी खाण्याचे प्रमाण बर्यापैकी वाढलेले दिसून येते.
अळिंबीविषयी असलेले गैरसमजही हळूहळू कमी होत आहेत. जसे दुध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे अळिंबीस आहारात ‘हेल्थ फूड’ म्हणजेच आरोग्यदायी अन्न म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे.
अलिकडील धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे तसेच प्रदूषित वातावरण व अन्न पदार्थांमुळे आजारपणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे.
अळिंबीच्या सेवनामुळे अशा अनेक घातक आजारांपासून व ताणतणावापासून सहजरित्या सुटका करून घेणे शक्य आहे असे संशोधनांती सिद्ध झालेले आहे.
त्याचप्रमाणे शाकाहारी लोकांसाठी हे एक वरदायी अन्न आहे. त्यामुळे अळिंबीचे आहारातील महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. यास्तव अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.
मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933, 9673510343
Facebook:
https://www.facebook.com/biobritte.agro
Website: https://www.biobritte.co.in
Tags: oyster mushroom farming, mushroom business, mushroom information in marathi, mushroom spawn , oyster mushroom training, biobritte, kolhapur mushrooms, oyster mushrooms, mushroom farming scope, mushroom training in maharashtra, mushroom spawn supplier, biobritte cart
Comments
Post a Comment