धिंगरी मश्रूम उत्पादन व्यवसाय | कमी गुंतवणुक व जास्त पैसे मिळवून देणारा व्यवसाय

अतिशय कमी साधने, कमी कालावधी आणि कमी जागेत लवकर नफा मिळवून देणारे म्हणून मशरुम उत्पादन फायदेशीर ठरते. 

एक किलो फ्रेश मशरुमचे दर १००-२५०  रुपये प्रती किलो पर्यंत असून सुकलेल्या मशरुमचे दर ४००-७०० रुपये प्रती किलो पर्यंत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी हा जोडधंदा किंवा मुख्य व्यवसाय म्हणून केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

दहा बाय दहाच्या खोलीत मशरूमचे उत्पादन घेता येते.बेड तयार करण्यासाठी प्लास्टिक पिशवी, दोरी, सोयाबीन, गहू किंवा पऱ्हाटीचे कुटार, स्पॉन (बीज) याचीआवश्यकता असते. 

मशरुममध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आहेत. प्रथिने, अ, क़, ड जीवनसत्वे आणि सर्व प्रकारची खनिजांची शरीराची गरज मशरुम पूर्ण करू शकते 

.त्याचबरोबर मशरुम बेडमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा कंपोस्ट खत म्हणून करता येतो.मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. 

मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर फोनः 9923806933