आरोग्यासाठी मशरूम वरदान ! अनेक लोकांच्या उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत म्हणून भारतात # मशरूमची लागवड हळूहळू वाढत आहे.

 

मशरुम खा अन् निरोगी राहा !

मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात मशरूम चा वापर केल्यास फायदा होतो.

मशरूम मध्ये असलेले पौष्टिक व औषधी गुणधर्म:

  • मशरूम हे स्वादिष्ट व पचनास हलके आहे त्याचसोबत त्यामध्ये पिष्टमय पदार्थ व साखर खूप कमी असल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणा-यांना मशरूम खाणे हे गुणकारी व आरोग्यवर्धक आहे.
  • मशरूम मध्ये प्रथिनांचे प्रमाण २.७ ते ३.९ टक्के असून हे प्रमाण फळे-भाजीपाला यांच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच मशरूम मधील प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही अमीनो ॲसिड असतात जे आपल्या शरीरास उपयुक्त आहेत॰ त्याचसोबत लहान मुलांच्या वाढीसाठी देखील हे अमीनो ॲसिड महत्वाचे असतात.
  • मशरूम मध्ये ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे आहेत त्याचसोबत पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह इत्यादी खनिजे देखील भरपूर प्रमाणात आहेत.
  • हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर मशरूम उपयुक्त ठरते.मशरूम प्रशिक्षण, मशरूम बियाणे आणि मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
☎मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग,
जयसिंगपूर-कोल्हापूर
✓संपर्क साधा- 9673510343, 9923806933.