गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते. आज सर्वत्रच निसर्गाचा लहरीपणा, नवनवीन कृषी धोरणे यामुळे आजचा तरुण शेतीकडे न वळता नोकरी, व्यवसायाच्या मागे लागला आहे. कोरोनामुळे बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. परंतु रोजगाराच्या संधी नाहीत म्हणून काही विद्यार्थी स्वस्थ बसत नाहीत.
कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगाव येथील सौरभ मोहिते, चैतन्य इनामदार, आशिष मोहिते, सुरज मोहिते, व अमित पवार या पदवीधर विद्यार्थ्यांनी मशरूम शेतीच्या माध्यमातून उन्नतीचा मार्ग शोधला आहे. आज या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मशरूम शेतीला सदिच्छा भेट दिली.
शेती निसर्गावर अवलंबून आहे, तर नोकरीच्या संधी फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणून या विद्यार्थ्यांनी जास्त नफा मिळवून देणारा मशरूम शेतीचा पर्याय निवडला आहे. खरंतर इतर तरुणांनीसुद्धा आदर्श घ्यावा, अशी या विद्यार्थ्यांच्या श्रमाची किमया आहे.
0 Comments