धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय | बायोब्राइट मशरूम | बायोब्राइट मशरूम कंपनी

धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय.  

अळिंबीचे आहारातील महत्व लक्षात घेता सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. यासाठी धिंगरी अळिंबीच्या जाती, लागवड पद्धत, पिक निगा, काढणी व प्रतवारी आणि पॅकिंग या संबंधीची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

अळिंबी हे सर्वसाधारणपणे त्याच्या इंग्रजी नावाने म्हणजे ‘मशरूम’ या नावानेच जास्त प्रचलित आहे. पूर्वी अळिंबीविषयी लोकांना फारशी माहिती नव्हती. 


धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय


परंतु यात असलेले पौष्टिक तसेच औषधी गुणधर्म यामुळे अलिकडे अळिंबी खाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी वाढलेले दिसून येते. अळिंबीविषयी असलेले गैरसमजही हळूहळू कमी होत आहेत. 

जसे दुध हे पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे अळिंबीस आहारात ‘हेल्थ फूड’ म्हणजेच आरोग्यदायी अन्न म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. 

अलिकडील धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे तसेच प्रदूषित वातावरण व अन्न पदार्थांमुळे आजारपणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. 

अळिंबीच्या सेवनामुळे अशा अनेक घातक आजारांपासून व ताणतणावापासून सहजरित्या सुटका करून घेणे शक्य आहे असे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. 

धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय
त्याचप्रमाणे शाकाहारी लोकांसाठी हे एक वरदायी अन्न आहे. त्यामुळे अळिंबीचे आहारातील महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. यास्तव अळिंबी लागवड हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.

 जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारची अळिंबी उपलब्ध आहे. त्यामध्ये बटन, शिताके, ऑयस्टर, मैताके, इनोकी, बीच, ब्लॅक इयर, दुधी मशरूम, भात पेंड्यावरील मशरूम इ. अळिंबीची लागवड केली जाते. भारतामध्ये प्रामुख्याने बटन आणि ऑयस्टर (धिंगरी) या अळिंबाची लागवड होते. 

बटन अळिंबाच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. परंतु धिंगरी ही अत्यल्प खर्चामध्ये घेतली जाणारी व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणारी अळिंबी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शेतीपूरक अथवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून ही अळिंबी घेता येईल.

चांगल्या उत्पादनासाठी प्रथमत: उत्कृष्ट जातीची निवड करणे अगत्याचे असते. त्यासाठी धिंगरी अळिंबीची आपल्याला हव्या असलेल्या जातींची निवड करावी.


धिंगरी अळिंबी लागवड- एक किफायतशीर व्यवसाय


धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार, प्रयोगशाळेत व निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या भारतात व विशेषत: महाराष्ट्रात घेतल्या जाऊ शकणार्‍या विविध जाती खालीलप्रमाणे : 

1. प्लुरोटस साजोर काजू, 2. प्लुरोटस इओस, 3. प्लुरोटस फ्लोरिडा, 4. प्लुरोटस फ्लॅबीलॅट्स, 5. प्लुरोटस ऑस्ट्रीटस, 6. प्लुरोटस सिट्रीनोपिलीटस.

परंतु, महाराष्ट्रात वरीलपैकी प्लुरोटस साजोर काजू, प्लुरोटस इओस, प्लुरोटस फ्लोरिडा आणि प्लुरोटस ऑस्ट्रीट्स या जाती प्रचलित आहेत.

 

प्लुरोट्स साजोर काजू : या जातीची फळे करड्या रंगाची असून ही जात तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे. याच्या उत्कृष्ट वाढीसाठी 20-30 अंश सें. ग्रे. तापमान व 80 ते 90% आर्द्रतेची आवश्यकता असते. फळे शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक व चविष्ट असल्याने चांगली मागणी आहे. 

प्लुरोट्स इओस : या जातीची फळे गुलाबी रंगाची असून ही जात 20 ते 25 अंश सें. ग्रे. तापमानात व 65 ते 90% आर्द्रता असलेल्या वातावरणात चांगली वाढू शकते. फळे शिजवल्यानंतर थोडी रबरासारखी वाटतात. अळिंबीची फळे गुच्छ स्वरूपात बेडवर येतात.

प्लुरोटस फ्लोरिडा : या अळिंबीचा रंग पांढरा शुभ्र असतो. परंतु फळे काढणीस उशीर झाला तर ती मऊ पडून नंतर काळसर होतात. बेडवर अळिंबी फळे गुच्छ पद्धतीने उगवतात व ती आकाराने मोठी असतात. 

प्लुरोट्स फ्लॅबिलॅट्स : फळांचा आकार हा पंख्यासारखा असून ती अगोदर गुलाबी व नंतर पांढरी होतात. फळे मऊ असून देठ आखूड असतो.

प्लुरोट्स ऑस्ट्रीटस : या जातीची फळे अंकुरत अवस्थेत निळ्या रंगाची दिसतात. परंतु, नंतर हा रंग फिक्कट होत जातो. फळे, गुच्छ पद्धतीने बेडवर येत असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळते तसेच ती चवीला उत्तम असल्याने बाजारात चांगली मागणी आहे.

महाराष्ट्रात धिंगरी अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे. अळिंबी खाण्याबाबत असणारे गैरसमज दूर करणे, लोकांना अळिंबी खाण्यास प्रवृत्त करणे, विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात दररोज ताज्या पालेभाज्या खाण्याचा प्रघात असून उपलब्धताही आहे. 

अळिंबी खाण्याकडे ग्राहकाचा कल वाढत आहे. त्यामुळे या पिकास भविष्यात निच्छीत चांगली मागणी वाढणार आहे.

बियाणे (स्पॉन) : 

स्पॉनचा पुरवठा कृषी महाविद्यालय, पुणे येथील केंद्रातून 500 ग्रॅमच्या पोलिप्रेपिलीन पिशव्यामधून रु. 70/- प्रती किलो प्रमाणे केला जातो. स्पॉन पार्सलने पाठविले जात नाही.

प्रशिक्षण : 

धिंगरी अळिंबी लागवडीचे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिले जाते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीस रु. 1000/- शुल्क आकारले जाते.


भारतातील मशरूम सल्लागार.

आपण बायोब्राइट कार्टमधून सर्व प्रकारचे मशरूम उत्पादने खरेदी करू शकता.

इष्टतम मशरूम कंपनी.

अधिक माहितीसाठी - https://biobritteagrosolutionspvtltd.in/shop.

फोनवर किंवा व्हॉट्सअॅपवर 9923806933 किंवा 7709709816 वर संपर्क साधा.


Tags - डाळ मिल प्रोजेक्ट इन मराठी,मत्स्यव्यवसाय माहिती pdf,Dal Mill project in marathi,