शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली. शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित परिमल रमेश उदगावे या युवकाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अळिंबी (मशरूम) स्पॉन निर्मिती, करार शेती त्याचबरोबरीने स्वतः अळिंबी उत्पादन, विक्रीतून व्यवसायाला नवी दिशा दिली. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांशी संपर्क साधत नवी बाजारपेठ विकसित केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी हे शिरोळ तालुक्यात ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव. या गावातील युवा शेतकरी परिमल रमेश उदगावे यांनी ऊस शेतीच्या बरोबरीने २०१८ पासून अळिंबी उत्पादन व्यवसाय सुरु केला. इंग्लंडमध्ये एमएससी बायोटेक्नॉलॉजी झाल्यानंतर काही काळ दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात त्यांनी नोकरी केली. त्यानंतर परदेशातील प्रयोगशाळेत एक वर्ष नोकरी केली. या अनुभवानंतर गावी परत येत त्यांनी २०१८ मध्ये बाजारपेठेचा अभ्यास करून अळिंबी उत्पादनाचा निर