मशरूम लागवड तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन | Mushroom Business Maharashtra

मशरूम शेती- कमी जागेत व कमी पाण्यात करता येईल असा उत्तम शेतीपूरक व्यवसाय परंतु अनेक गैरसमज व अफवा ह्यामुळे हा व्यवसाय काहीसा बदनाम झालाय. काय आहे मशरूम शेती बद्दल सत्य परस्थिती व कशी करावी मशरूम ची लागवड व विक्री हयाबद्दल सर्व माहिती ह्या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.




प्रस्तावना:
मशरूम ज्याला आपण मराठी मध्ये अळिंबीअसे देखील म्हणतो ही बुरशी गटात मोडणारी वनस्पति आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मशरूम ला वेगवेगळी नावे देखील आहेत जशे कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी, सात्या, डुंबरसात्या, केकोळ्या इत्यादि. मशरूम चे उत्पादन घेण्यासाठी कमी जागा व कमी पाणी लागते आणि मशरूम ची मागणी ही भारतासह पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जगभरामद्धे मशरूम चे व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे आहेत त्यामुळे दररोजच्या आहारात मशरूम चा वापर केल्यास फायदा होतो.

मशरूम मध्ये असलेले पौष्टिक व औषधी गुणधर्म:
  • मशरूम हे स्वादिष्ट व पचनास हलके आहे त्याचसोबत त्यामध्ये पिष्टमय पदार्थ व साखर खूप कमी असल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब असणा-यांना मशरूम खाणे हे गुणकारी व आरोग्यवर्धक आहे.
  • मशरूम मध्ये प्रथिनांचे प्रमाण २.७ ते ३.९ टक्के असून हे प्रमाण फळे-भाजीपाला यांच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच मशरूम मधील प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही अमीनो ॲसिड असतात जे आपल्या शरीरास उपयुक्त आहेत॰ त्याचसोबत लहान मुलांच्या वाढीसाठी देखील हे अमीनो ॲसिड महत्वाचे असतात.
  • मशरूम मध्ये ब-१, ब-२ व क जीवनसत्त्वे आहेत त्याचसोबत पालाश, कॅल्शियम, सोडियम, स्फुरद, लोह इत्यादी खनिजे देखील भरपूर प्रमाणात आहेत.
  • हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर मशरूम उपयुक्त ठरते.
मशरूम च्या जाती:
बटन मशरूम, शिंपला (धिंगरी) मशरूम, या जातींची भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
राष्ट्रीय अळिंबी संशोधन केंद्रह्यांनी मधरूम च्या काही जाती संशोधित केल्या आहेत जसे काबुलभिंगरी/धिंगरी, यू-३, एस-११, एस-७६, एस-७९१, एनसीएस-१००, एनसीएस-१०१/१०२, एनसीबी-६, एनसीबी-१३ इत्यादी.
बटन मशरूम:
  • बटन मशरूमची लागवड ही मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या राज्यात केली जाते.</li>
  • दीर्घ मुदतीची पद्धत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीची पद्धत (१६ ते १८ दिवस) हयाद्वारे कंपोस्ट तयार केले जाते व त्या कंपोस्ट खतांवर बटन मशरूमची लागवड केली जाते.
  • तयार केलेले कंपोस्ट पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करून कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात मशरूम चे बी पेरले जाते.
  • १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो.
  • बटन मधरूम उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस ठेवावे लागते.
शिंपला (धिंगरी) मशरूम:
  • शिंपला/धिंगरी मशरूम ची लागवड ही संपूर्ण भारतात केली जाते.
  • ह्या मशरूम ची लागवड ही नैसर्गिक वातावरणात करता येते. ह्यासाठी साधारणतः तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५% असावे लागते.
  • शिंपला (धिंगरी) मशरूमची लागवड ही बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे.
  • खूप कमी जागेत व कमी पाण्यामध्ये कमी पैसे खर्च करून उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला (धिंगरी) मशरूमचा उल्लेख केला जातो.
मशरूम लागवड पद्धत:

कच्चा माल:
मशरूम उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून कापसाची वाळलेली झाडे, भाताचे काड, गव्हाचे काड व भुसा, सोयाबीनची पाने/काड्या/भुसा, ऊसाची पाचट, केळीची पाने व बुंधा, मक्याच्या व ज्वारीच्या धाटांचा उपयोग होतो.
कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक मशरूम चे महत्वाचे अन्न आहे त्यामुळे सेल्युलोज ज्या घटकात अधिक असते त्यावर मशरूम चे उत्त्पन्न अधिक येते.
सगळ्यात जास्त सेल्युलोज हे कापासच्या वाळलेल्या काड्या व पाने ह्यात असते त्याखालोखाल भाताचे काड, गव्हाचे काड, सोयाबीनची पाने / काड्या ह्यात असते. नारळाची पाने, ऊसाची पाचट ह्यात सेल्युलोज कमी असते.
लागवडीसाठी जो कच्चा माल वापरणार आहात तो कोरडा हवा तसेच तो नवीन काढणीचा हवा. त्यामुळे जो कच्चा माल वापरायचाय त्याची काढणी झाल्यावर तो पावसात भिजून न देता बंदिस्त जागी साठवावा.


The difference between hay and straw in the garden

जागा:
मशरूम उत्पादनाकरीता जागा ही बंदिस्त स्वरुपाची लागते. झोपडी, बांबू हाऊस, मातीचे घर यांमध्ये मशरूम उत्त्पन्न अत्यंत उत्तम घेता येते.



     

लागवड पद्धत:
  • मशरूम लागवडीच्या वेळी लागवडीसाठी वापरायचा असलेला कच्चा माल लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास तो चांगला भिजून द्यावा व मग त्याचे गरम पाण्यात  निर्जंतुकीकरण करावे.
  • निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि. गरम पाणी घ्यावे(८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम पाणी) किंव्हा ड्रम मधेच पाणी ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले कच्चा माल १ तास ठेवावा. त्यामुळे त्यातील जंतु मरून तो निर्जंतुक होतो. त्यानंतर निर्जंतुक केलेला कच्चा माल २ तास निथळण्याकरिता ठेवावा.
  • त्यानंतर प्लॅस्टिक च्या पिशवीमद्धे अंदाजे दोन ते अडीच इंच निर्जंतूक केलेले कच्चा मालाचा थऱ द्यावा. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी (स्पॉन) पेरावे. त्यानंतर पुन्हा निर्जंतूक केलेले कच्चा मालाचा थऱ व त्यावर बी (स्पॉन) चा थऱ अशाप्रकारे पिशवी भरून घ्यावी.
  • पिशवी भरताना कच्चा माल दाबून भरावा. पिशवी भरल्यावर पिशवीचे तोंड चांगले बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.



  • बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे. अशा वातावरणात १५ दिवसात बी (स्पॉन) ची वाढ होते.
  • पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. अशावेळी बेडवरील पिशवी ब्लेडने अलगद कापावी व वेगळी करावी. त्यानंतर बेड १५ सें.मी. अंतर ठेवून रॅकवर ठेवावेत.
  • मशरूम चा वाढीकरता तापमान २० ते ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी हवामानानुसार बेडवर दिवसातून २ ते ३ वेळेस पाण्याची फवारणी करावी. जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडावे. त्यामुळे खोलीमध्ये अपेक्षित तापमान व आद्रता राहील. पाण्याची फवारणी करण्यासाठी पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करू शकतो.
  • पिशवी फाडून बेड रॅक वर ठेवल्यापासून ३ ते ४ दिवसात मशरूम ची वाढ होते. मशरूम ८-१० सें.मी. व्यासाचे होते व ते पांढरे किंवा करड्या रंगाचे दिसायला लागते. अशावेळी आपण मशरूम काढू शकतो.
  • मशरूम काढण्याच्या ४ ते ५ तास आधी बेडवर पाणी मारू नये. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत.
  • मशरूम काढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. त्यानंतर वरील मुद्यांमद्धे सांगितल्याप्रमाणे पाणी देऊन तापमान व आद्रता राखावी. त्यामुळे ८ ते १० दिवसांनी दुसरे पीक व परत १० दिवसांनी तिसरे पीक मिळते. अशा पद्धतीने एकदा लागवड करून मशरूम चे तीन पिके मिळतात.
  • एका बेड (पिशवी) पासून १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत म्हणून करण्यात येतो.
मशरूम ची साठवण:
मशरूम काढल्या नंतर गार पाण्यात प्रथम स्वच्छ धुवावा. त्यानंतर पातळ फडक्यारत बांधून उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे ठेवावा. त्यानंतर परत गार पाण्यात ठेवून थंड करावा. त्यानंतर मशरूम मधील जास्तीचे पाणी काढून तो  उघड्यावर परंतु सावलीत वाळून द्यावा व मग प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवावा.






मशरूम विक्री व्यवस्था:
मशरूम चा वापर घरगुती खाण्यात होतोच पण त्याचसोबत मशरूम ला मोठ्या मोठ्या हॉटेल मध्ये खूप मागणी आहे. मशरूमपासून लोणची, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादनेही बनविली जातात व ह्या उत्पादनाना देखील बाजारात मागणी आहे.
त्याचसोबत अनेक कंपनी मशरूम उत्पादनाचे ट्रेनिंग तर देतातच पण त्याचसोबत शेतकर्यां कडून करार पद्धतीने मशरूम खरेदी देखील करतात. त्यामुळे शेतकर्‍यांना बाजारपेठ शोधत बसावे लागत नाही. शेतकरी आपले पूर्ण लक्ष उत्पादन वाढीवर देऊ शकतात व चांगले उत्पन्न घेऊ शकतात.



कमी गुंतवणूकीत मशरूम व्यवसाय सुरु करा.


***सध्या फ़क़्त कोल्हापूर व सांगली भागातील लोकांसाठी
मशरूम फार्मर ग्रुप चे सदस्य व्हा आणि मश्रूम उगवून परत आम्हाला द्या.
मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर जवळपास दोन वर्षाहून मशरूम वर काम करत आहे. मशरूम फार्मर ग्रुप मध्ये नोंदणी करा आणि मिळवा नियमित रोजगार. मश्रूम शेती बद्दल सर्व शंका आणि माहिती साठी संपर्क साधा. 
मशरूम उत्पादन प्रशिक्षण मिळेल. 
संपर्क : 9923806933 / 9673510343