मश्रूम क्रीम सूप

 मश्रूम क्रीम सूप

 साहित्य:

२०० ग्रॅम सूप

२ टीस्पून तेल

१ टीस्पून बटर

२ टीस्पून बारीक चिरलेला कांदा

१ टीस्पून मैदा

१/२ टीस्पून काळी मिरी

१/२ टीस्पून लसूण पेस्ट

१/४ कप फ्रेश क्रीम


कृती:

१. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या.

२. कढईत तेल गरम करून त्यामध्ये १ टीस्पून बटर घालून ते विरघळू द्या.

३. बटरमध्ये आले टाका आणि चांगले  परतवून घ्या.त्यात चिरलेले मशरूम , मीठ , लसूण घाला आणि सर्व जिन्नस एकत्र करून घ्या.

४. १ चमचा मैदा टाका आणि परतवून घ्या.

५. त्यानंतर ३ कप पाणी घालून त्यात काळी मिरीची पावडर टाकून कढई वर झाकण ठेवा आणि ४-५ मिनिट शिजू द्या.

६. कढईत थोडे मशरूम म्हणजे १/४ मश्रूम अक्खे राहू देत आणि ३/४ मशरूमचे तुकडे मिक्सरमध्ये पाणी घालून थोडस भरडून घ्या.

७. वाटलेले मशरूम त्याच कढईत घाला ज्यात अक्खे मशरूमचे तुकडे आहेत.

८. सूप २-३ मिनिटे उकळू द्या.त्यात १ टेबल स्पून क्रीम घाला.

९. मशरूमचे स्वादिष्ट सूप तयार आहे. सूप एका भांड्यात काढून घ्या.