मशरूम बिर्याणी

 मशरूम बिर्याणी

 
साहित्य:

२०० ग्रॅम मशरूम 

२ टीस्पून तूप

२ तमालपत्र

२ दालचिनी

१ चक्रफुल

५ लवंग

४ वेलदोडे

१/२ टीस्पून काळी मिरी

१/२ चमचा जीरे

१ बारीक चिरलेला कांदा

१ कापुन भाजलेला कांदा

१ टीस्पून आल लसूण पेस्ट

बारीक चिरलेला कोबी

गाजर

वाटाणा

बटाटा

घेवडा

१ कप दही

हळद

तिखट

बिर्याणी मसाला

जिरे पावडर

मीठ

कोथिंबीर

पुदिना

१/२ कप बासमती तांदूळ

कृती:

१. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या.

२. कुकरमध्ये २ टीस्पून तुपामध्ये तमालपत्र, दालचिनी, चक्रफुल, लवंग, वेलदोडे, काळी मिरी, जिरे भाजून घ्या.

३. बारीक चिरलेला कांदा व आल लसून पेस्ट घालून परतून घ्या.

४. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, वाटाणा, बटाटा, घेवडा, एकत्र करा.

५. दही, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, बिर्याणी मसाला, मीठ घालून कमी ज्योत वर परतून घ्या.

६. त्यानंतर वरून पुदिना, कोथिंबीर , भाजलेला कांदा घाला.

७. ३० मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ पसरवा.

८. पुन्हा बिर्याणी मसाला, मीठ, भाजलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर पसरवा.

९. वरून तूप घाला. २ कप पाणी घालून झाकण बंद करून २५ मिनिट शिजवा.

१०. मशरूम बिर्याणी तयार आहे. मशरूम बिर्याणी एका भांड्यात काढून घ्या.