मशरूम हॉट व सोर सूप

 मशरूम हॉट व सोर सूप

 साहित्य:

२०० ग्रॅम मशरूम

२ टीस्पून तेल

बारीक चिरलेला कांदा

घेवडा

गाजर

कोबी

१ टीस्पून आल लसूण पेस्ट

सोया सॉस

मैदा पीठ

विनेगार

काळी मिरी पावडर

कांद्याची पात

कृती:

१. मशरूम ओल्या कापडाने पुसून छोट्या आकारात कापून घ्या

२. मैदा पीठ २-३ टेबल स्पून पाण्यात घालून त्याच्या गुठळ्या जाईपर्यंत ढवळा.

३. कढईत तेल गरम करून त्यामध्ये  कांदा भाजुन घ्या, त्यानंतर आल लसून पेस्ट व चिरलेले गाजर, घेवडा, कोबी परतून घ्या.

४. मश्रूम एकत्र करून चांगले भाजून घ्या.

५. जिन्नस चांगले शिजल्यानंतर पाणी घालून ५ मिनिट उकळून घ्या.

६. सोया सॉस व मीठ (चवीनुसार) घालून मिश्रण हलवा.

७. बनवलेले मैदा पीठाचे मिश्रण घालून २ मिनिट उकळून घ्या.

८. विनेगार व काळी मिरी पावडर घाला.

९. वरून कापलेल्या कांद्याची पात घाला.

१०. मशरूम सूप तयार आहे. मशरूम सूप एका भांड्यात काढून घ्या.