मशरूम मसालासाठी लागणारी सामग्री:
• 350 g मशरुम्स
• 2 कांदे उभे चिरून
• 3/4 हिरव्या मिरच्या
• 1/2 टीस्पून जिरे पूड
• 1/2 काळा मसाला
• 1/2 टीस्पून गरम मसाला
• 1/2 हळद
• 1/2 टीस्पून मिरची पुड
• 1/2 टीस्पून मिरपूड
• मीठ
• कोथिंबीर
मशरुम्स फ्राय बनविण्याचा विधी:
• मशरुम्स 3/4 वेळा धुवून घ्यावेत. ही भाजी पटकन होणारी आहे.
• कढईत तेल गरम करून जिरे फोडणी द्यावी. कांदा घालून नर्म होईपर्यंत भाजणे. मिरच्या घालाव्यात.
• मशरुम्स घालून परतून घ्यावे.मशरुम्स ला पाणी सुटत राहते. हे पाणी कमी होईपर्यंत एकसारखे परतुन घेणे.
• भाजी मंद आचेवर 5 मिनिटे ठेवून द्यावी.नंतर गॅस बंद करावा. गरम भाकरी सोबत छान लागते.