मशरूम मसाला रेसिपी

 



 

मशरूम मसालासाठी लागणारी सामग्री:

2 कांदे

2 टोमॅटो

मशरूम चे तुकडे

6 हिरव्या मिरच्या

4 लवंगा

1 छोटा चमचा दालचिनी

1 चमचा लाल तिखट

1 चमचा जीरेपुड

अर्धा चमचा हळद पावडर

1 चमचा लसुण पेस्ट

1 कप फोडणीकरता तेल

1 चमचा पेस्ट बनवलेली मेथीची पानं


मशरूम मसाला बनविण्याचा विधी:

कांदे आणि टोमॅटो चांगले बारीक कापुन घ्या त्यानंतर एका कढईत तेल गरम करून त्यात दालचिनी आणि लवंग टाका. 

काही मिनीटांतच त्यात कांदा टाका, जेव्हा कांदा सोनेरी रंगावर परतला जाईल त्यात लसणाची पेस्ट, लाल तिखट जीरे आणि हळद टाका आणि चांगले मिक्स करून घ्या मिसळल्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाका.

मसाला जेव्हा चांगला परतला जाईल आणि तेल वरती दिसायला लागेल तेव्हां त्यात टोमॅटो आणि हिरवी मीरची टाका. 

मिश्रण चांगले एकजीव होउद्या मग त्यात मशरूम चे तुकडे टाका आणि मंद आचेवर कमीत कमी 10 ते 15 मिनीटे शिजु द्या. 

आता त्याला मेथी च्या बारीक पानांनी सजवा, यामुळे त्यात एक खास लागेल.

गरम गरम मशरूम मसाला पोळी सोबत खा आणि जेवणाचा आनंद घ्या.