कोर्डिसेप्स अळिंबी | Cordyceps mushrooms | Cordyceps mushroom benefits | Cordyceps supplier Maharashtra

  •  कोर्डिसेप्स अळिंबी ही परोपजीवी बुरशी असून ती निसर्गतः किड्यांच्या अळ्या आणि कोषामध्ये वाढते. ही अळिंबी औषधी बुरशीचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे. 
  • या अळिंबीस हिवाळ्यातील कीड, उन्हाळी गवत असेही म्हणतात. यामधील अनेक जैवसक्रिय घटकांमुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.  


  • कोर्डिसेप्स अळिंबी थंड प्रदेशीय जंगले आणि आर्द्र समशीतोष्ण भागामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. या अळिंबीच्या ४०० हून अधिक प्रजाती आहेत. मात्र, कॉर्डिसेप्स सायनेंसिस आणि कॉर्डिसेप्स मिलिटारिस या दोनच प्रजाती आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. 
  • आतापर्यंत कॉर्डिसेप्समधून अनेक जैवसक्रीय (बायोॲक्टिव्ह) घटक (नुक्लिओसाईड्स, कॉर्डीसेपिन, अडेनोसाइन, पॉलिसॅकराइड्स, एर्गोस्टेरॉल, मॅनिटॉल, प्रथिने, अमिनो आम्ले, पॉलीपेप्टाईड्स) काढण्यात आले आहेत. 
  • या सर्व घटकांमुळे कॉर्डिसेप्स शरीराला बहुअंगाने फायदेशीर ठरते. कोर्डिसेप्स अळिंबीचे बाजारातील मूल्य हे त्यातील कॉर्डीसेपिन या घटकांच्या प्रमाणावर अवलंबून असते.  
  • या अळिंबीमध्ये सूज विरोधी, कर्करोग विरोधी, कावीळ संरक्षणात्मक, थकवा, अतिसार, डोकेदुखी, खोकला, संधीवात, यकृत रोग, मूत्रपिंडाचा आजार आणि नपुंसकता यासंबंधीच्या आजारांसाठी प्रभावी गुणधर्म आहेत. त्यामुळे या अळिंबीची लागवड करणे फायदेशीर आहे.

Tags: कोर्डिसेप्स अळिंबी, Cordyceps mushrooms,Cordyceps mushroom benefits,Cordyceps supplier Maharashtra, कॉर्डिसेप्स अळिंबी उत्पादनाचे तंत्र, cordyceps mushroom, benefits, cordyceps mushroom side effects, cordyceps mushroom price, cordyceps mushroom supplement, cordyceps benefits for male, best time to take cordyceps, cordyceps and cancer

Post a Comment

0 Comments