- दुधी अळिंबी लागवडीसाठी जागेची निवड, वाढीसाठी लागणारे माध्यम आणि वातावरण तसेच काडाचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे.
- लागवडीसाठी पक्क्या इमारतीपेक्षा गवत, प्लॅस्टिक कागद किंवा तत्सम साधन सामुग्रीपासून बनविलेल्या कच्च्या शेड किंवा झोपडीचा वापर करावा.
- दुधी अळिंबी ही उष्णकटीबंधीय आणि उप-उष्णकटीबंधीय भागात लागवडीसाठी योग्य अळिंबी आहे.
- उच्च जैविक उत्पादन क्षमता, उत्तम गुणवत्ता, साधी लागवड प्रक्रिया आणि पांढरा आकर्षक रंग या गुणधर्मामुळे ही अधिक लोकप्रिय आहे.
- या अळिंबीच्या वाढीसाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ९० टक्के आर्द्रता आवश्यक असते. दुधासारखा पांढरा असल्याने या अळिंबीला ‘दुधी अळिंबी’ म्हटले जाते.
- अळिंबीचा देठ लांब व फळाचा आकार मोठा असतो. या अळिंबीच्या उत्पादनाची पद्धत बटन अळिंबीपेक्षा वेगळी आहे.
- यामध्ये काही बाबी धिंगरी व बटन अळिंबीच्या उत्पादन पद्धतीसारख्या आहेत.
Tags: दुधी अळिंबी, Milky Mushroom Cultivation, Milky Mushroom information in marathi,Benefits Of Milky mushroom, milky mushroom spawn,
Comments
Post a Comment