लठ्ठपणापासून बचाव
- वजन वाढविणे फारसे अवघड नाही, परंतु कमी करणे मुश्कील असते.
- वजन कमी करण्यासाठी अळिंबी एक चांगला नैसर्गिक पर्याय आहे.
- अळिंबीमध्ये तंतुमय पदार्थ आणि विविध जैवसक्रिय संयुगे आढळतात. ही संयुगे लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दूर करण्यास मदत करतात.
- अळिंबीतील विविध घटकांमुळे (जीवनसत्त्व ब-२ व ब-३) आपण खालेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर लवकर होते. त्यामुळे चयापचय करण्यासाठी लागणारी ऊर्जा तयार होऊन चयापचय क्रिया सुरळीत होते. परिणामी वजम कमी होण्यास मदत होते.
- तसेच अळिंबीमधील अँटीऑक्सिडेटिव्ह गुणधर्म वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित शारीरिक व्यायामासह अळिंबीचे सेवन महत्त्वाचे आहे.
Tags: reishi mushroom weight loss, reishi mushroom weight loss reviews, reishi mushroom benefits, mushroom appetite suppressant, मशरूम लठ्ठपणापासून बचाव कसे करते?
Comments
Post a Comment