Mushroom Hotel Recipe | मशरूमला चांगली मागणी

मशरुम शहरातील हॉटेल्समध्ये अत्यंत महागड्या डिशच्या स्वरूपात मिळतो.

आधुनिक पध्दतीने मशरूमचे उत्पादन आपल्याला घेता येते. व्यापारी तत्वावर जर मशरुमचे उत्पादन घेतले तर कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत, चांगल्या नियोजनाने चांगला नफा मिळवता येतो. 

शहरातील लोकांच्या कडुन, हॉटेल व्यवसायिकांकडुन मशरूमला चांगली मागणी आहे, मशरूममध्ये असलेल्या अनेक पौष्टिक गुणधर्मांमुळे, त्याला चीनमध्ये औषध आणि रोममध्ये देवाचे अन्न म्हटले जाते.