अळिंबी /मशरूम | Mushroom information in marathi

 मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.

निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते. [1]

भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.

बटन मशरूम

हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट खत तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करतात. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बटन मशरूमचे बी पेरतात. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर त्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. या उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते. पूर्वीपासूनच जगभर स्वताचे अस्तित्व जपत बटन मशरूम बऱ्यापैकी ठराविक वर्गातील लोकांचे स्वयपाक घरात जावून पोहोचला आहे.५० Kg बटन मश्रूम दररोज तयार करायचे असल्यास अशा प्रकल्पास जागेच्या किमतीशिवाय कमीत कमी २३ ते २५ लाख रुपये बिजभांडवल लागते. त्यामुळे सधन लोक हे व्यवसायिक स्वरूपाचे केले जाते.[2]

शिंपला मशरूम

शिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.

संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड होथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.

दुधी मशरूम

दुधी मशरूम (MILKY MUSHROOMS) हे मशरूम दुधासारखे पांढरे असते म्हणून ह्याला दुधी मशरूम असे म्हणतात. तसेच याचे उत्पादन उन्हाळ्यामध्ये करतात म्हणून याला summer मशरूम म्हणून पण ओळखतात. हे मशरूम साधारणपणे बटण मशरूम सारखे असून याचे देठ व वरील भाग बटन मशरूम पेक्षा लांब व मोठा असतो. धिंगरी मशरूम व बटन मशरूम या दोन्हीचे गुणधर्म असतात. दुधी मशरूम साठी धिंगरी मशरूम लागवडीप्रमाणे तंत्रज्ञान असते. १४-१५ दिवसांनी प्लास्टिक पिशवी काढण्याऐवजी हि पिशवी वरील बाजूने उघडी करून त्यावर बटन मशरूम प्रमाणे केसिंग करावे लागते. यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.



कमी गुंतवणूकीत मशरूम व्यवसाय कसा सुरू करावा?

जर आपणास व्यवसायाची सुरूवात करायला आवडत असेल पण गुंतवणूकीचा अभाव असेल तर मशरूम व्यवसाय फायदेशीर असू शकतो कारण मशरूमच्या शेतासाठी प्रारंभिक खर्च कमी असतो. तसेच, आपण लहान प्रमाणात प्रारंभ केल्यास, आपण अर्ध-वेळेची नोकरी म्हणून ते करू शकता.

  • मशरूम कशी वाढवायची ते शिका

प्रारंभ करण्यापूर्वी, मशरूम कशी वाढवायची याबद्दल स्वत:ला शिक्षित करा. अनेक कंपन्या या बुरशी वाढवण्यासाठी अभ्यासक्रम आणि सेमिनार देतात.

  • जागा शोधा

प्रथम, आपल्याला आपल्या मशरूमसाठी वाढणारी जागा शोधण्याची आवश्यकता असेल आणि त्यास मोठ्या प्रमाणात आवश्यकता नाही. १०० किलो मशरूमची एक बॅच वाढविण्यासाठी १०×१० फुट जागा पुरेशी आहे. आपल्याला अशी जागा पाहिजे लागेल जिथे आपण तापमान, आर्द्रता आणि प्रकाश नियंत्रित करू शकता. तुमच्या घरात तुमच्याकडे अशी जागा आधीच असेल जी या गरजा पूर्ण करेल. आपण असे केल्यास, परंतु आपण परिस्थिती नियंत्रित करण्याबद्दल निश्चित नसल्यास तुषार सिंचनचे फवारे खरेदी करणे, एक ह्युमिडिफायर आणि डेह्युमिडिफायर खरेदी करण्याचा विचार करा.

  • साहित्य खरेदी करा

मशरूम व्यवसायासाठी लागणारे साहित्य म्हणजे प्रामुख्याने भुसा किवा काड आहे. यशस्वी मशरूम व्यवसायासाठी स्वच्छता ही एक महत्वाची बाब आहे कारण पुष्कळ गोष्टी संभाव्यतः दूषित होवू शकतात. म्हणून निर्जंतुकीकरण केलेला पेंढा वापरा. पुढे मशरूम बियाणे खरेदी करा.

  • मशरूम विक्री

वाढत्या ऑयस्टर मशरूमपासून सुरूवातीपासून ते कापणीच्या वेळेपासून जवळजवळ सहा आठवडे लागतात. कापणीनंतर आपण ते शक्य तितक्या लवकर विकू शकता जेणेकरून ते ताजेतवाने असतात. आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या बाजारपेठेत एक मार्केट सुरक्षित करा आणि तेथे विक्री करा किंवा स्थानिक रेस्टॉरंट्स किंवा किराणा दुकानांवर थेट विक्री करा. ताजे ऑयस्टर मशरूम ८० ते २५० ₹/किलोच्या दरम्यान विकतात. ड्राय ऑयस्टर मशरूम ४००₹/किलो ते ७०० ₹/किलो पर्यंत विकले जाऊ शकतात.

म्हणून जर आपली १०×१० जागा असेल तर त्यातून १०० किलो मशरूम तयार करु शकता आणि अंदाजे १०० ₹/किलोग्राम विक्री केली तर आपण १०,००० ₹ प्रति तोडणी मिळवू शकता.

जर आपण ड्राय मश्रूम विक्री केले तर ते ५,००० ते ७,००० ₹ प्रति बॅच तोडणी होऊ शकते.

त्याशिवाय आपण मूल्यवर्धित मशरूम उत्पादनांद्वारे अधिक पैसा मिळवू शकता. जे आपल्याला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात मदत करू शकतात.

महाराष्ट्रातील मशरूम माहिती केंद्र

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सर्वात अत्याधुनिक मशरूम माहिती केंद्र आहे. इथे वेगवेगळ्या मशरूम प्रकारांबद्दल माहिती व प्रशिक्षण राबविले जातात. तसेच शेतकर्यांसाठी मशरूम बियाणे उपलब्ध करून दिले जातात.

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, कोकण व गोवा आहे. तसेच सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, लातूर या भागात कार्यरत आहे.

मशरूम लर्निंग सेंटर कोल्हापूर हा BIOBRITTE AGRO SOLUTIONS PRIVATE LIMITED चे युनिट असून गेल्या ३ वर्षापासून कार्यरत आहे. इथे प्रामुख्याने धिंगरी मशरूम , शित्तके मशरूम, गनोडर्मा, मिल्की व इतर मशरूमबद्दल पूर्ण माहिती दिले जातील.