मश्रुमचे औषधी गुणधर्म
- मशरूममध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असून ते हाडांच्या मजबुतीसाठी मदत करते. मशरूमचे नियमित सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस, सांधेदुखी आणि हाडांच्या क्षीणतेशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता कमी होते.
- मशरूममध्ये नैसर्गिक प्रतिजैविक आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपल्याला विविध संक्रमणापासून दूर ठेवण्यास मदत करतात. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात असणारे जीवनसत्त्व अ, ब आणि क रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
- मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी मशरूम सुपर फूड मानले जाते. यामध्ये कर्बोदकांचे आणि चरबीचे प्रमाण कमी असते. मशरूम क्रोमिअमचा चांगला स्रोत आहे. रक्तातील साखरेची पातळी राखण्यास क्रोमिअम मदत करते.
- मशरूममध्ये विविध प्रकारचे लेक्टिन असतात. जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
- जास्त प्रथिने व कमी ऊर्जा असते.
- किडणीच्या आजारावर गुणकारी.
- लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार.पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत.
- तंतूपदार्थ, प्रथिने, सेलेनियम आणि पोटॅशिअम तसेच जीवनसत्त्वे ब-१, ब-२, ब-१२, क, ड आणि ई यांची उपलब्धता.
- रोगजंतू विरोधी, मधुमेह विरोधी, बुरशीजन्य विरोधी, दाहक-विरोधी, अँटी-ऑक्सिडंट, परजीवीविरोधी, अँटी-ट्यूमर, अँटी-व्हायरल असे गुणधर्म.
Tags: मश्रुम खाण्याचे फायदे, मश्रुमचे औषधी गुणधर्म, MUSHROOM HEALTH BENEFITS, mushroom benefits for men, mushroom health benefits and side effects, white mushroom health benefits disadvantages of eating mushroom, mushroom benefits for women, button mushroom health benefits and side effects, uses of mushroom, mushroom benefits for skin
Comments
Post a Comment