मशरूमचे विविध प्रकार | Types of Oyster Mushrooms | Mushroom Classification In Marathi
मशरूमचे विविध प्रकार
चागा (आयनोटस ओबिलिकस)
- यास बर्च मशरूम किंवा चागा कॉंक असेही म्हणतात. ही गडद तपकिरी आणि काळी बुरशी असून बहुधा झाडावर वाढते.
- चागामध्ये आढळणारे घटक अँटी-ऑक्सिडंट, पॉलिफेनोल्स तसेच कॅन्सरविरोधी बेटुलिन आणि बेटुलिनिक ॲसिड यावर प्रभावी ठरू शकतात.
कॉर्डिसेप्स (ऑपिओयोकार्डिसेप्स सायनेन्सिस)
- तांत्रिकदृष्ट्या मशरूम नसले तरी कॉर्डीसेप्स ही एक दुर्मीळ बुरशी आहे. ही केवळ ईशान्य भारतातील सिक्कीमच्या उंच प्रदेशात वाढते.
- यामध्ये कर्करोगविरोगी गुणधर्म असतात. कोलेस्ट्रॉल आणि ह्रदयरोगावरील उपचारासाठी उपयोगी.
ऑयस्टर (प्लायरोटस)
- ऑयस्टर मशरूम हा बुरशीचा एक प्रकार.
- हे मशरूम जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲटींऑक्सीडंट ने परिपूर्ण.
- फुप्फुस आणि स्तनाच्या कर्करोगावर फायदेशीर. यामध्ये अनेक दाहक-विरोधी आणि वेदनाशामक घटक.
शिताके (लेन्टिन्युला एडोड्स)
कर्करोगापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास प्रभावी. यामधील लेन्टीनन नावाचा घटक कर्करोगविरोधी असून त्याचा वापर हिपॅटायटीस सी आणि एचपीव्ही सारख्या आजारांच्या उपचारासाठी करतात.
टर्की टेल (कॉरिओलस व्हर्सीकलर)
- या मशरूमवर तपकिरी रंगाची रिंग असते. हे मशरूम वेगवेगळ्या आकारात आणि रंगात येते.
- संसर्गजन्य आजार, कर्करोग आणि एड्स सारख्या आजारांच्या उपचारासाठी वापर.
Types Of Mushroom In Marathi |
👉मश्रूम उत्पादन प्रशिक्षण घेण्यासाठी आजच संपर्क करा.
✓मश्रूम लर्निंग ट्रेनिंग, जयसिंगपूर-कोल्हापूर:
फोन- 9923806933 or 9673510343
Tags - Mushrooms in Marathi, 1 and more Types of Mushroom, types of mushroom in india, types of mushroom, mushroom in marathi name, scientific name of mushroom, अळिंबीचे फायदे, मश्रुमचे फायदे, benefits of mushroom in marathi, mushroom in marathi, mushrom cultivation in marathi, अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन् आहारातील महत्त्व, अळिंबी उत्पादनामध्ये मोठ्या संधी, अळिंबी म्हणजेच मशरूम लागवड आणि उपलब्ध संधी 2022,
0 Comments