धिंगरी आळिंबी | Oyster Mushroom Information | Oyster Mushrooms

  • धिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. 
  • धिंगरी अळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या आहेत. 



  • धिंगरी अळिंबीमध्ये (मशरूम) अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. आधुनिक पद्धतीने अळिंबी लागवड केल्यास आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरू शकते. 
  • अत्यंत कमी भांडवलाची गुंतवणूक करून धिंगरी अळिंबीची लागवड करता येते. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी धिंगरी अळिंबीच्या जाती, लागवड पद्धत, पिकाची निगा, काढणी, प्रतवारी आणि पॅकिंग या बाबी महत्त्वाच्या आहेत.  
  • आपल्याकडे बटण आणि धिंगरी (ऑयस्टर) आळिंबाचे उत्पादन घेतले जाते.  बटण आळिंबीच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. तर धिंगरी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. धिंगरी आळिंबीच्या रंग, रूप, आकारमान व तापमानाची अनुकूलता यानुसार विविध जाती विकसित करण्यात आलेल्या  आहेत. 
  • जागेची निवड  आळिंबी उत्पादनासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. 
  • पक्के किंवा कच्चे बांधकाम असलेली खोली किंवा शेड असावी. 
  • जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश येणार नाही आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
  • लागवडीसाठी माध्यम  अळिंबी लागवडीसाठी पिष्टमय पदार्थ अधिक असणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. 
  • शेतातील पिकांचे अवशेष, भात पेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका यांची ताटे , कपाशी, सोयाबीन, तूर काड्या, उसाचे पाचट, नारळ झावळ्या, केळीची पाने, भुईमूग शेंगांची टरफले, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा  वापर करता येतो.
Tags:  धिंगरी आळिंबी, Oyster Mushroom Information, Oyster Mushrooms, oyster mushroom recipe, oyster mushrooms growing, oyster mushroom benefits, oyster mushrooms nutrition, types of oyster mushroom, oyster mushroom scientific name, oyster mushrooms near me, oyster mushrooms identification

Post a Comment

0 Comments